अमळनेर : येथील ख्यातनाम मंगळ ग्रह मंदिरात लक्ष्मीचे प्रतीक असलेले श्रीयंत्र तसेच लक्ष्मीच्या मूर्तीवर विधिवत अभिषेक करून लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.
लक्ष्मीपूजनाचे मानकरी विजय मेडिकलचे संचालक प्रकाशशेठ पारख तसेच चैत्राम फूडचे संचालक राकेश साळुंखे यांनी सपत्नीक पूजा केली. राकेश साळुंखे यांनी छप्पनभोग अर्पित केले. त्यानंतर महाआरती होऊन पूजेची सांगता झाली.
मंदिराचे पुरोहित तुषार दीक्षित, सौरभ वैष्णव, जयेंद्र वैद्य यांनी पौरोहित्य केले.
याप्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस .एन .पाटील, सचिव एस .बी .बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सेवेकरी आशा महाले, आर .टी.पाटील आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.