
2023 पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान जीवन गौरव पुरस्कार श्री उमेश धनराळे याना देण्यात आला
जळगाव: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोच्च बहुमान जीवन गौरव पुरस्कार 2023 सहारा समय चे वरिष्ठ विभागीय प्रतिनिधि श्री उमेश धनराळे याना देण्यात आला

12 वर्ष print मीडिया आणि तब्बल 29 वर्षे सहारा समय राष्ट्रीय वृत्त वाहिनी साठी वरिष्ठ विभागीय प्रतिनिधि म्हणुन कार्यरत आहेत.
तळागाळातील शोषित घटकांना न्याय मिळवून देणे, आणि समाज विघातक कृत्य उघडकीस आणून चुकणारया प्रशासकीय यंत्रणेवर वचक,चांगल्या बातम्यांना योग्य न्याय या चतुर्सूत्री च्या चौकटीतून यशस्वी वाटचाल करत येणार्या में महिन्यात 60 व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत,पत्रिकारिता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे श्री उमेश धनराळे याना हा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार राज्याचे पाणी पुरवठा मंत्री श्री गुलाबराव पाटील राज्याचे अधिस्वीकृती समिति चे अध्यक्ष श्री य दु जोशी ,महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष श्री वसंतराव मुंडे,,मंत्रालय व विधिमंडळ पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री प्रमोद डोईफोडे,जळगाव चे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद राज्याचे मराठी पत्रकार संघाचे सचिव श्री विश्वासराव आरोटे,विभागाचे कार्याध्यक्ष श्री डीगंबर महाले, महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे विभागीय ध्यक्ष श्री प्रविण साळुंखे ,जिल्हाध्यक्ष श्री शरद कुलकर्णी इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत अल्पबचत भवन जळगाव येथे प्रदान करण्यात आला, या वेळी उत्तर महाराष्ट्रातील असंख्य पत्रकार, विविध पत्रकार संघटनांचे पदाधिकारी तथा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते