सावखेडा ग्रामसेवक कारवाई प्रकरणी अमळनेर गटविकास अधिकारी यांना समजपत्र

दिव्यांग कायदा २०१६ कलम ८९ व ९३ कारवाईस महाराष्ट्रातील पहिला ग्रामसेवक पात्र

अमळनेर: सावखेडा ग्रामपंचायत ता.अमळनेर येथील सलग अनेक वर्षांपासून दिव्यांग ५% निधी खर्च न केल्याप्रकरणी दंडात्मक व प्रशासकीय कारवाईस पात्र असलेले ग्रामसेवक मनोज शरद दहिवदकर यांच्यावर जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिकेत पाटील यांनी वेळोवेळी गटविकास अधिकारी अमळनेर श्री.सुशांत पाटील यांना पत्रव्यवहार केला होता. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला न जुमानता, सदर आदेशाला केराची टोपली दाखवत कुठलीही कारवाई न करता, संबंधित ग्रामसेवकास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची गंभीर बाब तक्रारदार योगेश पवार यांनी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. सदर तक्रारीची दखल घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिकेत पाटील यांनी अमळनेर गटविकास अधिकारी यांना शेवटी समज पत्रांवये, ३ दिवसांत दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ चे कलम ८९ व ९३ अन्वये, दंडात्मक कारवाई करून विभागीय चौकशीसाठी दोषारोपपत्र १ ते ४ भरून ३ दिवसांत तात्काळ जिल्हास्तरावर पाठवण्याची समज दिली आहे. त्यानुसार अमळनेर गटविकास अधिकारी यांनी आतापर्यंत संबंधित दोषी ग्रामसेवकावर कारवाई का? केली नाही याबाबत तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे. दिव्यांगाच्या हक्काच्या निधीवर गदा आणणाऱ्या ग्रामसेवकास अभयदान देण्यामागे नेमका उद्देश काय ? अशीही चर्चा दिव्यांग व्यक्तींकडून व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यावरून आलेल्या आदेशानुसार शेवटी अमळनेर गटविकास अधिकारी कारवाई करतील का ? यांकडे तालुक्यातील दिव्यांगांचे लक्ष योगेश पवार यांनी केंद्रित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]