सेवानिवृत्त जीवन सूर्यवंशी यांचा प्रामाणिकपणा

नातवाने तीस हजार किंमतीचा सापडलेला मोबाईल केला परत —

अमळनेर:येथील मुंदडा नगर जवळील गजानन महाराज मंदिराजवळ दादासाहेब जी. एम. सोनार नगर येथील रहिवासी श्री. समाधान पाटील यांचा हरवलेला मोबाईल सेवानिवृत्त एस टी महामंडळाचे कर्मचारी श्री. जिवन काशीराम सूर्यवंशी यांना सापडला असता त्यांनी आपल्या नातवाला आपबिती सांगितल्यावर हा मोबाईल कुणाचा आहे. त्यांना परत करु आणि नातवाने नंबर शोधत समाधान पाटील यांना त्यांचा तीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल लागलीच परत केला.

सविस्तर वृत्त असे की, श्री. जीवन सूर्यवंशी हे सेवानिवृत्त असल्याने दररोज सायंकाळी आपल्या सेवानिवृत्त मित्रांबरोबर दादासाहेब जी. एम. सोनारनगर कडे मोकळ्या पटांगणात फिरायला येतात. आज ता.27 रोजीही ते सायंकाळी येताना रस्त्यावर मोबाईल पडलेला दिसला. मात्र आजूबाजूला कुणी नसल्याने त्यांनी तो मोबाईल आपल्या घरी नेत आपल्या नातवाला सर्व आपबीती सांगितल्यावर मला हा मोबाईल समजत नाही मात्र ज्याचा आहे त्यांना परत कर सांगीत रात्रपाळीला कामाला निघून गेले. नातू मंथन पाटील याने आपल्या वडिलांना बोलावून पप्पा हा मोबाईल ज्यांचा आहे त्यांना परत करुया असे सांगत मंथन आणि त्याचे वडील रविंद्र पाटील यांनी मोबाईल मधला संपर्क क्रमांक शोधत साने गुरुजी शाळेचे उपशिक्षक श्री. समाधान पाटील यांना संपर्क करीत त्यांना त्यांचा तीस हजार रुपये किंमतीचा मोबाईल परत केला.
एस.टी.महामंडळात तुटपुंज्या पगारावर सेवा केलेले ह. भ. प.जीवन सूर्यवंशी आजही सेवा निवृत्ती नंतर काम करीत आहे. मात्र संस्काराची रुजवण त्यांच्या अंगी आणि त्यांचा मुलगा रविंद्र व नातू मंथन यांनी त्यांचे संस्काराची जाणीव ठेवीत महागडा मोबाईल परत केला. त्यामुळे जी. एम. सोनार नगर वासियांनी शिरुड नाक्याजवळील क्रांती चौकात राहणाऱ्या श्री. जीवन सूर्यवंशी व त्यांचे नातू मंथन यांचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]