द्रौ.रा.कन्याशाळेत विद्यार्थीनीनी नवरात्री निमित्त केला नवदुर्गांचा जागर

शाळेतील कला ,क्रीडा व संस्कृत शिक्षकांनी केली तयारी

अमळनेर : येथील द्रौ.रा.कन्याशाळेत सकाळ व दुपार विभागाच्या विद्यार्थीनी  दररोज नवदुर्गांचा जागर करीत आहेत. नवरात्रीनिमित्त कला विभागातर्फे फळ्यावर चित्ररूपी नवदुर्गाची स्थापना करण्यात आली आहे. दररोज  शालेय विद्यार्थिनी महिषासुरमर्दिनी स्तोत्राने परिपाठाची सुरुवात करतात. त्यामध्ये सारंगी पाठक, शिवानी महाजन,योगिनी चौधरी, धनश्री पाटील, प्रणिता चौधरी,चैताली चौधरी, प्राची दोरकर, श्रावणी मोरे, परिणीता शिरसाठ या महिषासुरमर्दिनी स्तोत्र म्हणतात. तर १५ ऑक्टोबर पासून दररोज नवदुर्गा विषयी माहिती सादर केली जात आहे. त्यात शैलपुत्री व ब्रह्मचारिणी या देवीची माहिती गार्गी जोशी ने दिली. चंद्रघंटा या देवीची माहिती योगिनी चौधरीने दिली.कुशमांडा देवीची माहिती स्वरांगी पाठक  ने दिली. स्कंदमाता या देवीची माहिती रुद्राणी अमृतकार हिने दिली. कात्यायानी  या देवीची माहिती आकांक्षा पाटील ने दिली. कालरात्री या  देवीची माहिती कृतिका साळुंखे ने दिली.तर महागौरी या देवीची माहिती खुशी चव्हाण ने दिली.  सिद्धीयात्री या देवीची माहिती शिवानी महाजन ने दिली.शाळा सुटते वेळी आरतीच्या आगोदर सर्व विद्यार्थीनी गरबा खेळतात. त्यानंतर शाळा सुटते. नवरात्री जागर उपक्रम शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल व मुख्याध्यापिका सीमा सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शना खाली झाला. पर्यवेक्षक व्ही एम पाटील ,जेष्ठ शिक्षिका एस.पी.बाविस्कर,एस.एस. माळी,रत्नमाला सोनवणे, जे.व्ही. बाविस्कर,करुणा शिक्षक डी. एन.पालवे संचालन करतात.तर नवदुर्गा जागरसाठी पी.पी.जोशी यांनी मार्गदर्शन केले.
गरबासाठी सर्व शिक्षिका मार्गदर्शन करतात.

अमळनेर तालुक्यात पहिल्यांदा द्रौ.रा.कन्या शाळेत चित्ररुपी दुर्गा देवीची स्थापन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्यासाठी कला शिक्षक एस.एस.माळी व डि.एन.पालवे यांनी फलक रेखांकन केले.तर शाळेत शिकविणाऱ्या शिक्षिकांनी दररोज गरबा खेळण्यासाठी विद्यार्थीनिंसाठी परिश्रम घेतले.

नवदुर्गा जागरसाठी सौ. पी.पी.जोशी यांनी केली तयारी.

शालेय परिपाठात रोज ज्या देवीची माहिती द्यायची आहे ती माहिती महिषासुरमर्दिनी स्तोत्र विद्यार्थ्यांनकडून पाठ करून परिपठात सादर करणे. असे उपक्रम शाळेत राबविण्यात आले.





Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]