गणपती उत्सव कृ उ बाजार समितीचे सभापतींनी केला असे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न
अमळनेर: कृषी उत्पन्न बाजार समितीत नुकताच पार पडलेला गणेशोत्सव हा मार्केटचे सर्व व्यापारी एकत्र येऊन साजरा करतात परंतु यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील हे मात्र पत्रकार परिषदेत सांगतात की, गणेशोत्सव आपणच साजरा केला असल्याचा केवलवाणा प्रकार समोर आला आहे परंतु पब्लिक सब कुछ जानती है हे विसरू नका. तसेच अमळनेर शहरात सर्वत्र बाजार समितीचे बॅनर शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यासाठी असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सह सर्व संचालक मंडळ अमळनेर शहरात सर्वत्र बॅनर लावतात तो सर्व खर्चही कृषी उत्पन्न बाजार समितीकडून वसूल केला जातो,तसेच मंत्री अनिल दादा पाटील यांच्या सत्काराच्या विषयात मंत्री महोदयांचा सत्कार हा नागरी समिती मार्फत होता बाजार समिती मार्फत नाही तरी सभापती हे हा सत्कार आपणच केला बाजार समिती मार्फत असा दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत . तसेच दि १८ऑक्टोबर रोजी अमळनेर कृषी उत्पन्न मासिक सभेत संचालकांची खडाजंगी झाली त्यावेळी काही संचालकांनी महिला संचालकांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोप सभापतींनी केला मग गुन्हा दाखल करण्यासाठी बाजार समिती सभापती कोणाची वाट बघत आहेत? तसेच त्याची नोंद प्रोसिडिंगवर घ्यायला आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून त्याची नोंद का झाली नाही तसेच याबाबत पोलिसात का तक्रार दिली नाही असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. विरोधी गटातील संचालकांनी ज्वारी, मका या धान्याचे नासाडी होऊ नये याबाबत दिलेल्या निवेदनावर काय कार्यवाही झाली? आपण शेतकरीपुत्र म्हणत असताना ही बाब प्रथम आपल्या निदर्शनास का आली नाही असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे.म्हणून सभापती व सत्ताधारी संचालकांनी स्वतः फुशारकी मारणे सोडून वरील विषयांवर लक्ष केंद्रित करावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.
बाजार समितीत आणलेल्या योजना व इतर कामे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांचे हित न जोपासता निकृष्ट व चुकीचे कामे करून टक्केवारी लाटणे सुरू आहे असाही आरोप काही बुध्दीजिवी लोकांकडून होत आहे.