अमळनेर शहरात जिवंत झाडांची केली कत्तल

अमळनेर शहरात बिनधास्तपणे होते वृक्षतोड एकीकड़े शासन कोट्यावधी रुपये खर्च करुन झाड़े लावा झाडे जगवा अभियान राबवत आहे आणि दुसरी कडे अमळनेर शहरात जिवंत झाडे तोडली जात आहे,

बरीच वर्षे जुनी असलेली व तिस ते चाळीस फूट उंच असलेली पाच ये सहा झाडांची बेकायदा कत्तल केली गेली असल्याची घटना धुले रोड अमळनेर राजभवन मागे घडल्याचे समोर आले आहे. ही झाडे मशिनच्या साह्याने तोडण्यात आली .

त्या संदर्भात वृक्षप्रेमी प्रवीण संताजीराव देशमुख यांनी नगरपरिषद अमळनेर येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे . अमळनेर शहरातील गणेश कॉलनी धुळे रोड़, परिसरातील कृषीभूषण माजी आमदार
साहेबराव पाटील यांच्या घराच्या पाठी मागे असलेली जीवंत वृक्षांची बिनधास्तपणे व कायदयाची पर्वा न करता व जुमानता सदर काही इसम यानी पाच ते सहा झाडे कत्तल करुन नष्ट केली आहेत त्यामुळे वृक्षप्रेमी नागरीकांची मने दुखवली गेली आहेत तसेच पर्यावरणाचा सुध्दा ऱ्हास झाला आहे तरी सदरचे कृत्य करण्याचा अधिकार कोणी दिला ज्यांनी झाड़ाची कत्तल केली आहे त्यांच्यावर कड़क कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणी
वृक्षप्रेमी प्रवीण संताजीराव देशमुख यांनी मा. मुख्याधिकारी साहेब,अमळनेर नगरपरिषद यांचे कडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]