परिवर्तन प्रवर्तक बहुजन फौंडेशन यावलचे संस्थापक अध्यक्ष मा. युवराज सोनवणे सन्मानीत

(जळगाव ):- 6ऑक्टोबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन संपन्न “या दिवशी मा .जिल्हाधिकारी साहेब व सहाय्यक आयुक्त साहेब समाज कल्याण तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद व जळगाव मनपा आयुक्त विद्याजी गायकवाड मॅडम यांचे उपस्थितीत. वृद्धाश्रम साठी कोळवद (सातोद ) तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी प्रथमच दहा हजार स्केअर फूट मध्ये सुरु करण्यात येणार आहे.व लवकरात लवकर भूमिपूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात येणार आहे.
म्हणून परिवर्तन प्रवर्तक बहुजन फौंडेशन यावल (NGO) चे संस्थापक अध्यक्ष आयु.युवराज सोनवणे यांचा.श्री आयुषप्रसाद जिल्हाधिकारी साहेब जळगाव यांचे हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जळगांव या ठिकाणी संपन्न झाला मार्गदर्शन जेष्ठ विधितज्ज्ञ सुशील अत्रे यांनी वृद्धासाठी चे असलेले अधिकारबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले तर वैद्यकीय तज्ञ डॉ. शशिकांत गाजरे यांनी वृद्धानी म्हातारपणात आरोग्याची आपली काळजी कशी घ्यायची या बद्दल मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी साहेब यांनी सुद्धा विविध प्रकारच्या योजनाची माहिती दिली व वृद्धाचे गावागावात व वॉर्डावार्डात मंच स्थापन करण्याचे आवाहन देखील केले. तसेच जेष्ठ नागरिक संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री डी. टी. चौधरी व जेष्ठ नागरिक संघांचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री.आप्पा साहेब जगतराव पाटील यांनी सुद्धा जेष्ठ नागरिकांच्या संघटनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमास परिवर्तन फौंडेशन चे पदाधिकारी आयु. मुकेश भाऊ सोनवणे व विशाल सोनवणे व मिलिंद तायडे. समाजिक कार्यकर्ते अशोक बोरेकर , ऍड किरण तेली, एड सागर गजरे,उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यालयीन अधीक्षक श्री राजेंद्र कांबळे साहेब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]