नगरसेवकांनी निधीचा पुरेपूर वापर केल्यास शहराचा विकास शक्य -ना. अनिल पाटील

अमळनेर : शहरविकासासाठी नगरपालिकेतर्फे मिळणाºया निधीचा नगरसेवकांनी पुरेपूर वापर केल्यास शहराचा विकास होऊन कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन मदत व पूनर्वसन मंत्री तथा नंदूरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अनिल पाटील यांनी अमळनेरात केले.
येथील बहादरपूर नाक्याजवळील भोईवाड्यातील नगरपरिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित मंत्री अनिल पाटलांचा भव्य नागरी सत्कार व प्रभाग १७ मधील विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार स्मिता उदय वाघ, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, माजी नगरसेवक भाईदास महाजन, हिंमत महाजन, नरेंद्र संदानशिव, विनोद कदम, विक्रांत पाटील, सोमा महाजन, डॉ. रामभाऊ शेलकर, डॉ. विलास महाजन, उद्योजक विनोदभैया पाटील, डॉ. अनिल शिंदे पांडुरंग शिंगाणे आदी उपस्थित होते.
ना. अनिल पाटील पुढे म्हणाले की, माझा सत्कार करण्यापेक्षा या प्रभागाचे माजी नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे ११.५० कोटीचा निधी वापरुन प्रभागाचा विकास साधला आहे. शहरातील प्रत्येक नगरसेवकाने असे काम करावे, जेणेकरुन शहराचा विकास साधला जाईल. पुढे अनिल पाटील म्हणाले की, मी नुकताच पालकमंत्री झालो. मुंबई, पुण्याचा पालकमंत्री झालो असतो तर तेवढा आनंद झाला नसता, मात्र मी नंदुरबारचा पालकमंत्री झाल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना त्याहीपेक्षा मोठा आनंद झाला. मंत्रीपद मिळाल्याने अमळनेरचे नाव जिल्हापूरते मर्यादित न राहता ते थेट दिल्लीपर्यंत पोहचले आहे. मी ही आता आपणास आवश्यक तेव्हढा निधी मिळवून देईल,असेही ते म्हणाले.
मंत्री अनिल पाटील यांचा वार्डातील नागरिकांतर्फे माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे , माजी नगरसेविका रत्ना महाजन व त्यांच्या कुटुंबीयांनी जंगी सत्कार केला. वार्डातील विविध समाज व संस्थांनीही सत्कार केले.
याप्रसंंगी प्रभाग १७ मध्ये सर्वसाधारण जिल्हा वार्षिक उपाय योजना २०२२-२३ नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजना अंतर्गत मरीमाता नगर ते कंजरवाडा रस्ता आरसीसी गटार, चेकर्स टाईल्स, रस्ता कॉँक्रिटीकरणासाठी ८१ लाख, ८३ हजार ४६३ रुपये तसेच माळीवाडा परिसरात रस्त्यांच्या कॉँक्रिटीकरणासाठी ८२ लाख ६९ हजार ५९९ असे एकूण १ कोटी ६४ लाख ५२ हजार ९८२ रुपयांच्या निधीच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, स्मिता वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक भगवान महाजन यांनी तर सूत्रसंचालन डिगंबर महाले यांनी
केले.

….असा माणूस कधीच आमदार झाला नाही होणार नाही….!

“ कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून बोलाविले नसतांनाही प्रमुख अतिथींच्या पहिल्या रांगेतील खुर्च्यांवर बसणारा, आयोजक व प्रमुख अतिथींना धक्के देऊन , त्यांना बाजूला करून फोटोसाठी पुढे घुसणारा , सतत वायफळ बडबड करणारा व चारित्र्यहीन माणूस अमळनेर विधानसभा मतदार संघात कधीही आमदार झाला नाही आणि होणारही नाही …! “ या परखड शब्दात डिगंबर महाले यांनी लगावलेला टोला कुणासाठी होता याची कार्यक्रमस्थळी व शहरातही जोरदार चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]