सोशल मीडियावर आक्षपार्ह पोस्ट टाकणाऱ्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल

दोन्ही तरुणांना पोलिसांनी केली अटक

अमळनेर: तालुक्यातील जानवे व रणाईचे येथील तरुणांनी एका महापुरुषाबाबत समाज माध्यमावर अत्यंत अश्लील भाषेत आणि आक्षेपार्ह टीका केली होती. या तरुणांवर काल अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. अट्रोसिटी व इतर कायद्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरीश बोरसे, रा. रणाईचे तालुका अमळनेर व आरोपी कल्पेश पाटील राहणार जानवे तालुका अमळनेर यांनी दि. 6 रोजी इंस्टाग्राम आक्षेपार्ह पोस्ट व कमेंट केली होती. एका महामानवाच्या बाबत व भारतीय संविधानाच्या बाबत ही पोस्ट व कमेंट करण्यात आली होती. हे समजल्यावर समाज बांधवानी अमळनेर पोलीस ठाणे गाठत संबंधित तरुणांवर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार समाधान मैराळे यांच्या फिर्यादी वरून भारतीय दंड संहिता 1860 नुसार 294 295 A, 504, 500, 3 1 r, 31 u, 3 1 u, 3 1 v या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

[democracy id="1"]