धक्कादायक: 14 वर्षीय चिमुरडीवर गेल्या तीन महिन्यांपासून नराधमाने केला वेळोवेळी बलात्कार

लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत करत होता बलात्कार

अमळनेर : शहरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे. लहान भावाला मारून टाकण्याची धमकी देत 14 वर्षीय चिमुरडीवर गेल्या 3 महिन्यांपासून नराधमाने वेळोवेळी बलात्कार केले आहेत.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या परिवारासोबत अमळनेर येथे राहते. तिची आई वैद्यकीय कामानिमित्त नंदुरबार येथे गेल्याने ती दोन्ही भाऊ व आजी यांच्यासोबत राहत होती. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून गल्लीत राहणाऱ्या विशाल कोळी याने घरात घुसून मुलीला तिच्या लहान भावास मारण्याची धमकी देत गेल्या तीन महिन्यांपासून
वेळोवेळी बलात्कार केले. मात्र घाबरून तिने भाऊ व आजीला घडलेला प्रकार सांगितला नाही.
तिची आई परत घरी आल्यानंतर व गेल्या दोन महिन्यांपासून तिला मासिक पाळी न आल्याने तिने तिच्या आईला घडलेली सगळी हकीगत सांगीतली.आईने प्रेग्नेंसी किट आणून तपासले असता मुलगी ही गर्भवती असल्याचे उघडकीय आले आहे. संतप्त आईने अमळनेर पोलीस ठाणे गाठून पोलिसात फिर्याद दाखल केली असून कलम 376 नुसार बलात्काराचा व पोस्को अंतर्गत विशाल बाबुराव कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ हे करीत आहेत.

[democracy id="1"]