मारवड महाविद्यालयात अमृत कलश संकलन कार्यक्रम संपन्न


मारवड ता.अमळनेर येथील कै.नानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे दि.20/ 09 /2023 रोजी ‘राष्ट्रीय सेवा योजना एकका’अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्र शासन व उच्च आणि तंत्र शिक्षण महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशनानुसार अमृत कलश संकलन कार्यक्रम संपन्न झाला, सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन.एस.एस.कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.डी.टी.कदम यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले यांनी याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवाच्या निमित्ताने स्वातंत्र्य चळवळीला उजाळा देऊन विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य प्रती प्रेरणा दिली, ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमांतर्गत सर्वांनी अमृत कलश मध्ये माती टाकून कलश पूजन केले, आणि सेल्फी फोटो काढले, सदर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ.जे.ए. माळी यांनी मानले,
कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

[democracy id="1"]