राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसने केले आंदोलन
अमळनेर: “राज्य शासनाने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने मेगाभरती करण्याचा जीआर काढला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात नोकरभरती होत असताना त्यामध्ये सामाजिक आरक्षण या सरकारने ठेवले नाही. ही कृतीच मुळात असंवैधानिक आहे. महाराष्ट्र शासनाने आरक्षणाचे तत्त्व नाकारले आहे का? तसेच, अ, ब, क आणि ड संवर्गातील या जागा असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात केवळ कंत्राटी पद्धतीने भरती होणार असेल तर ही बाब संशयास्पद आहे. कुणाचं तरी उखळ पांढरं करण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे असा याचा अर्थ होतो. एकीकडे राज्यात बेरोजगारीने कहर केला आहे. अनेक सुशिक्षित तरुण काम मिळत नाही, म्हणून रिकामे बसलेले आहेत. त्यांना शासन किमान हमी असणारी एक नोकरी देखील देऊ शकत नाही, ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे या तरुणांची व महाराष्ट्रातील जनतेची ही फसवणूक आहे. महागाई, नापिकी अशा दुष्टचक्रात अडकलेल्या तरुणांच्या हाताला कायम शासकीय नोकरी मिळाली तर शासनाला काय अडचण आहे. त्यामुळे या युवकांचे भविष्य अंधारात ढकलनाऱ्या शासन आदेशाच्या विरोधात आज राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या जीआरची होळी करून शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
या वेळी उपस्थित राष्ट्रवादी युवकचे योगेश शिसोदे, ऋषीकेश बोरसे,अजय कढरे, राष्ट्रवादी विध्यार्थीचे तालुकाध्यक्ष अनिरुद्ध शिसोदे,शहराध्यक्ष सनी गायकवाड,जनार्धन पाटील, कुलदीप पाटील,समीर शेख,कृष्णा बोरसे,तन्वीर पठाण,विध्यार्थी सचिन आनंद चव्हाण,महेश शिसोदे,शामकांत हिरे, सुदर्शन पाटील,देव गोसावी,महेश पाटील, देवेश निकम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..!