अंमळनेर येथे होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनास जनतेने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे केले आवाहन

सुप्रसिद्ध वक्ते आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे

अमळनेर : “महापुरुषांची विचारधारा समजून घेत कालानुरूप विकसित करणे आवश्यक बाब असून अमळनेरमध्ये राबवित असलेले राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान हे संपूर्ण राज्यासाठी एक मॉडेल होऊ शकते” महापुरुषांच्या विचारांवर आधारित फेब्रुवारी २०२४ मध्ये अंमळनेर येथे होणाऱ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनास जनतेने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते आणि इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी केले.
येथिल छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रा. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नुकताच आयोजित प्रबोधन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते श्रीमंत कोकाटे यांनी बोलतांना पुढे सांगितले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर आदी महामानवांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा दाखला देत कोणत्याही कठीण प्रसंगात डगमगून न जाता आपल्या विचारधारेवर निष्ठा ठेवून संघर्ष करत राहिल्यास यश प्राप्त होते असे प्रतिपादन केले. महापुरुषांचा वारसा हा विज्ञानवादाचा आणि प्रयत्नवादाचा असून अतार्किक, अवैज्ञानिक अंधश्रद्धा झुगारून देत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या प्रयत्नवादी आणि कृतीप्रवण मार्गावर वाटचाल करावी असे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले. विज्ञानवाद हा केवळ विचारात असून चालत नाही तर आपले रोजचे जीवन, आहार, विहार यात देखील अंमलबजावणी करीत या विचारधारेला महिला स्वातंत्र्य आणि महिलांचा सन्मान याची जोड दिल्यास समाजात सकारात्मक बदल निश्चितपणे दिसून येतील असे प्रतिपादन केले. प्रा.अशोक पवार सातत्याने विविध महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने युवा कल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्यांच्या सोबत शेकडो वक्ते तयार करून राबवीत असलेले राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानचे मॉडेल प्रेरणादायी ठरेल असेही कोकाटे यांनी सांगितले. यावेळी लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी प्रा. पवारांशी संबंधित विविध आठवणींना उजाळा देत शैक्षणिक सामाजिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला.
प्रास्ताविकात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी “सामाजिक प्रबोधनाचे काम करणाऱ्या प्रा.पवारांसारख्या व्यक्तींचा जन्मदिवस हे प्रबोधनपर व्याख्यानानेच साजरे व्हावेत हा आदर्श सदर व्याख्यानाने निर्माण केल्याचे सांगितले.
सरपंच संघटनेचे अध्यक्ष महेंद्र बोरसे, राष्ट्रसेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी हि यावेळी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे यांनी केले. जिजाऊ वंदना सौ.वसुंधरा लांडगे यांनी गायली तर आभार प्रदर्शन डी. ए. पाटील यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय गौतम मोरे यांनी करून दिला.
याप्रसंगी विविध सामाजिक संगटना,पदाधिकारी यांचे वतीने प्रा.अशोक पवार यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अमळनेर मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी एच.टी.माळी,श्रीमती कोकिळाबेन शहा ट्रस्टचे अध्यक्ष चेतन भाऊ शहा, भारती गाला,निवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, माजी नगरसेवक शाम पाटील,एस डी देशमुख, बन्सीलाल भागवत, नितीन निळे,पन्नालाल मावळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, अजय भामरे, सोपान भवरे, योगेश पाटील, अशोक पाटील, यतीन पवार, प्रा डॉ माणिक बागले, प्रा.डॉ.राहुल निकम आदींनी परिश्रम घेतले.

[democracy id="1"]