मंत्री अनिल पाटील यांचा 10 रोजी अमळनेरात भव्य नागरी सत्कार

सत्कार समितीतर्फे जय्यत तयारी सुरू,सर्वपक्षीय व सर्व समाजाचे प्रतिनिधी देणार उपस्थिती

अमळनेर: महाराष्ट्र राज्याचे (मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन) मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील
यांचा नागरी सत्कार सोहळ्याचे आयोज दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे आयोजित करण्यात आला आहे.
नामदार अनिल भाईदास पाटील नागरी सत्कार समिती यांच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.अमळनेर मतदारसंघास प्रथमच आमदार अनिल पाटील यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्री पदाचा मोठा बहुमान मिळाल्याने अमळनेर विधानसभा क्षेत्रातील सर्व पक्षीय मान्यवर तसेच विविध संस्था आणि विविध समाजाच्या प्रतिनिधींनी एकत्रित येऊन हा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी गेल्या दहा दिवसांपासून सुरू असून समितीचे सदस्य अतिशय जोमाने कामाला लागले आहेत.प्रत्येक जण मिळेल ती जबाबदारी स्वीकारून कामाला लागला आहे.अमळनेर मतदारसंघातील जनतेला मंत्रीमहोदयांचा सत्कार करण्याची पहिल्यांदाच मिळत असल्याने ऐतिहासिक असा हा सोहळा ठरणार असून तरी शहरातील तमाम व्यापारी बंधू,ग्रामिण भागातील शेतकरी व ग्रामस्थ,सर्व समाजाचे प्रतिनिधी, विविध संस्था व मंडळाचे प्रतिनिधी व नोकरदार वर्गाने यावेळी उपस्थिती देऊन या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार व्हावे असे आवाहन नागरी सत्कार समितीतर्फे करण्यात आले आहे.

[democracy id="1"]