अमळनेर: तालुक्यातील ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी यांच्या व्यवस्थापकीय मंडळ 2023 ते 2038 या पंचवार्षिक निवडणुकीत डॉक्टर अशोक हिम्मतराव पाटील संचालक पदी निवडून आलेत म्हणून त्यांचे डॉक्टर भाविका अजय पाटील यांनी अभिनंदन केले.
डॉक्टर भाविका यांनी बी एच एम एस चे शिक्षण घेतले असून त्या शिरुड तालुका अमळनेर येथील मूळ रहिवासी आहेत त्या अजय विनायकराव पाटील यांच्या कन्या तर तिलोत्तमाताई रवींद्र पाटील यांच्या त्या पुतणी आहेत
डॉक्टर भाविका यांचे लहानपणापासून स्वप्न होते की मला डॉक्टर व्हायचे परंतु मी डॉक्टर होणार तरी कशी ही चिंता त्यांना नेहमी सतवत असे त्यावेळी अमळनेर येथील डॉक्टर अशोक हिम्मतराव पाटील यांनी डॉक्टर भाविकाला मार्गदर्शन केले व डॉक्टर भाविकाने जिद्द चिकाटी ठेवून अखेर डॉक्टर झाले म्हणून आपल्या गुरूंचं आपण कुठेतरी देणे लागतो त्या भावनेने भाविका यांनी डॉक्टर अशोक हिम्मतराव पाटील हे ग्रामविकास शिक्षण संस्था मुडी येथे संचालक पदी निवडून आल्यामुळे डॉक्टर भाविकांनी फुलगुच्छ देऊन अभिनंदन केले