पत्रकार धनंजय सोनारांसह सर्वच स्पर्धकांचे प्रबोधन

दिशादर्शक-प्रा. अण्णा माळी महात्मा फुले विचार मंच, धुळे आणि बापूसो. ग.द.माळी गुरुजी
व्याख्यानमाला समितीतर्फे जयंती कार्यक्रम संपन्न!

अमळनेर: केवळ धुळेच नव्हे तर महाराष्ट्रातील उच्च कोटीच्या ह्या महाजन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात व्याख्यानमालेची परंपरा चालविणाऱ्या प्रांगणात अमळनेर येथील सामाजीक कार्यकर्ते धनंजय सोनार यांचा सत्कार करण्यात आला.ना. छगन भुजबळ यांचे बद्दल निबंध स्पर्धेतील प्रथम विजेते म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. धनंजय सोनार यांचे सह सर्वच विजेत्या स्पर्धकांचे कार्य दिशादर्शनासाठी माईलस्टोन ठरेल असे प्रा. अण्णा माळी यांनी यावेळी सांगितले.
कालकथीत ग द माळी परिवारातर्फे वैचारीक जागरणाचे हे कार्य अभिनंदनीय असून मोठमोठ्या व्याख्यानमालांच्या परंपरेसारखे आहे.
मिलींद सोनवणे, प्राचार्य व्ही. बी.पाटील आणि प्रा.अण्णा माळी यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे. असे मान्यवरांनी सांगितले.
दिवंगत बापूसो ग.द.माळी गुरुजींच्या जयंती निमित्त २सप्टेंबर रोजी आयोजित केलेला बापूसाहेबांच्या कार्याचा गौरव प्रशंसनीय ठरला.
.डॉ. बापूराव देसाइ, प्राचार्य व्ही.के.भदाणे, डॉ अभिनव दरवडे,
सदर प्रसंगी ओम गांगुर्डेस , कु.दर्शना महाजन व अनेक स्पर्धेतील बक्षीसपात्र गुणवंताना रोख रक्कम व ग्रंथ देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी मोहन दयाराम सोनवणे, दिलीप दयाराम सोनवणे, आनंदा धर्मा पाटील, राजिव पंडितराव पाटील, सुशिलाताई दंगलराव महाजन, डॉ. सूरज सुनिल सोनवण, अमित सोनवणे, प्रा. वाय्.आर्.माळी, हिरामण चौधरी,जे.एस्.पाटील, प्राचार्य बी.एच्.जाधव, प्राचार्य बी.बी.महाजन, प्राचार्य एस्.एस्.पाटील,व्ही.एन्.बिरारी तसेच डॉ. सुशिल महाजन,डॉ.रविंद्र पाटकरी ,वामनराव जाधव, गोपालभाऊ देवरे, पदाधिकारी उमेश महाजन, माजी नगराध्यक्ष हनुमंतराव वाडिले, उद्यानपंडित विलासराव माळी,विठोबा वाडिले, चैत्राम भदाणे, देवेंद्र पाटील, मंसाराम माळी, शिवाजीराव जाधव, ज्ञानेश्वर महाजन,आर.डी.तायडे, ज्ञानेश्वर तुकाराम माळी,दिलीप देवरे इत्यादींसह म.फुले विद्या प्रसारक संस्थेच्या सर्व शाखांचे कर्मचारी बंधु भगिनी,आदर्श माध्यमिक विद्यालय देवपूर व कळमसरे येथील कर्मचारी बंधु भगिनी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती अध्यक्ष मिलींद सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचलन समिती कार्याध्यक्ष प्रा. अण्णा माळी यांनी केले.आभार प्रदर्शन विचार मंच कार्याध्यक्ष तथा समिती प्रचार प्रमुख राहुल महाजन यांनी केले.यशस्वितेसाठी अमित सोनवणे यांचेसह महाजन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, प्रा थमिक शाळा आणि आदर्श माध्यमिक विद्यालय देवपूर व कळमसरे यांच्या सर्व अध्यापक व अध्यापकेतर कर्मचारी बंधु भगिनींचे सहकार्य लाभले.

[democracy id="1"]