मारवड (प्रतिनिधी) कै.न्हानाभाऊ म. तु. पाटील कला महाविद्यालय मारवड ता. अमळनेर येथे आज विद्यार्थी विकास विभागामार्फत भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ.जितेंद्र माळी यांनी आपल्या प्रस्तावनेतून डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती दिली.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत देसले उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना अध्यक्षीय मनोकाताद्वारे अनमोल असे मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक दिन साजरा करण्यात आला .
सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्रस्तुत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाजमीन पठाण हिने केले. तर आभार प्रदर्शन कोमल पाटील हिने केले.