महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांची अमळनेरला मंगळ ग्रह मंदिर येथे धावती भेट. तालुक्यातील पत्रकार संघाचा घेतला आढावा

अमळनेर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांची अमळनेर येथे मंगळ ग्रह मंदिर येथे धावती भेट देत तालुक्यातील पत्रकार संघाचे आढावा घेतला.त्यांचे अमळनेर येथे आगमन होताच हेडावे फाट्यावर फटाके वाजवून आतिषबाजी करून जंगी स्वागत करण्यात आले यानंतर भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मंगळग्रह मंदिरात दर्शनासाठी जाण्याचा योग आला.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष शरद कुलकर्णी यांनी मंगळ देवस्थान ट्रस्टचे वतीने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांचा व दैनिक समर्थ गांवकरी महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचा पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य यांना डॉ विश्वासराव आरोटे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अमळनेर येथील पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष जयंतलाल वानखेडे,जिल्हा कार्याध्यक्ष विजय गाढे, विभागीय सरचिटणीस रवींद्र मोरे, तालुका कार्याध्यक्ष समाधान मैराळे ,तालुका सचिव सुरेश कांबळे, उमेश धनराळे, नूर पठाण ,बापूराव ठाकरे ,प्रवीण बैसाणे, दिनेश पालवे ,हितेंद्र बडगुजर ,आत्माराम अहिरे , कमलेश वानखेडे,विक्की जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते .

[democracy id="1"]