दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्या चिमणपुरी पिंपळे शेतकऱ्यांची मागणी

अमळनेर: तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे व परिसरात पावसाचा खंड असल्यामुळे दुष्काळग्रस्त स्थिती निर्माण झाली असल्याने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत माननीय.तहसिलदार रुपेशकुमार सुराणा साहेब व माननीय.कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे साहेब यांना निवेदन दिले पावसा अभावी पिके सुकू लागली आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे निवेदन देताना युवराज डी पाटील ,निबा दयाराम चौधरी, विनोद नाना पाटील,विनोद नारायण पाटील,नारायण भालेराव पाटील,रावसाहेब दौलत पाटील,अरविंद लुका पाटील, गोविंदा काशिनाथ चौधरी,दगडू ढोमन चौधरी, लोटन रामा चौधरी,गोकुळ चुडामन पाटील ,संतोष बापू चौधरी,पुरूषोत्तम लोटन चौधरी, भीमराव नारायण पाटील,छोटु पुना चौधरी,संतोष मन्सराम पाटील मनोहर दगा पाटील,संदिप लोटन पाटील,महेंद्र गटा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते

[democracy id="1"]