अमळनेर – तालुक्यातील डांगर बुद्रुक येथे एका १० वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना दि २९ रोजी सकाळी १०.३० वाजता घडली
आई वडील शेतात मजुरी कामासाठी गेले असता चि.आकाश राजेंद्र भिल इयत्ता ४ थी वय १० वर्ष हा डांगर बु.येथिल जिल्हा परिषद शाळेत जात असताना त्यास सर्पदंश झाला त्यावेळेस काकानां माहिती मिळताच त्यास जानवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले त्यांनी आकाशला अमळनेर ग्रामिण रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले मात्र त्याठिकाणी व्हेंटिलेटर व सर्पदंशचे औषधे नसल्याचे कारण सांगत त्यास धुळे येथील रुग्णालयात नेण्याचे सांगितले धुळे येथे पोहचल्यावर त्यांनी आकाशला मृत घोषित केले.
दरम्यान आकाश चे काका यांनी शासकीय आरोग्य यंत्रणा सुसज्ज राहिली असती तर माझा पुतण्याला मी वाचवू शकलो असतो कारण डांगर बु.हे गाव धुळे रोडवर आहे अमळनेर किंवा धुळे येथे जाण्यासाठी अंतर व वेळ सारखाच लागतो अशी खंत व्यक्त केली.