अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाचा मंत्री अनिल पाटलांच्या हस्ते मंत्रालयात शुभारंभ

उद्यापर्यंत निधी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार

मुंबई-महाराष्ट्र राज्याचे मदत्त व पुनर्वसन (आपत्ती व्यवस्थापन) मंत्री अनिल पाटील यांनी मुंबई येथे मंत्रालयात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना निधी वितरणाबाबत आढावा घेऊन ई केवायसी केलेल्या 3,00,000 शेतकऱ्यांकरिता मदतीचा रु.210.30 कोटी इतका निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याकरिता संगणकीय प्रणालीवर कळ दाबून हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रीया सुरु केली.
मागील पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी करिता शासनाने विशेष बाब म्हणून रु.1500.00 कोटी इतका निधी बाधित शेतकाऱ्यांकरिता मंजूर केला आहे.मदत व पुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डिबीटी प्रणालीमार्फत या निधीचे वितरण सुरु आहे.मंत्री अनिल पाटील यांनी वितरणाचा शुभारंभ केल्यानंतर उद्यापर्यंत हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. तसेच पुढील शुक्रवार पर्यंत आणखी 2,50,000 शेतकऱ्यांकरिता रु.178.25 कोटी इतका निधी त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचप्रमाणे शेतीपिकांच्या नुकसानीकरिता तातडीने मदत मिळावी यासाठी, आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई केवायसी करण्याचे मा.मंत्री महोदयांनी शेतकऱ्यांना आवाहन केले. ही सेवा निशुल्क असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. तसेच डिबीटी प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या त्रुटीदेखील तातडीने दूर करण्याच्या सूचना मा. मंत्री महोदयांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
शासन शेतकऱ्यां प्रती सजग असून शेतकऱ्यांकरिता कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे मा.मंत्री महोदयांनी यावेळी स्पष्ट केले.

[democracy id="1"]