गुणवत्तेशी तडजोड करू नका नूतन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांचे प्रतिपादन

नूतन गटशिक्षणाधिकारी
रावसाहेब पाटील यांचा सत्कार व शाळेतील विद्यार्थी शिक्षकांची केली विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन

अमळनेर :शिक्षण हे एकमेव माध्यम आहे जे आपल्याला यशाकडे घेऊन जाते. शिक्षणामुळेच आपण जगात सर्वोत्कृष्ट बनतो, केवळ पुस्तकी ज्ञान म्हणजे शिक्षण नाही. पण यशासाठी आपला मानसिक विकासही आवश्यक आहे. नुसती कल्पना करून यश मिळू शकत नाही, ते यश पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम हवेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका असे प्रतिपादन देवगाव देवळी येथे जिल्हा परिषद शाळेत पंचायत समितीचे नूतन गट शिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील सदिच्छा भेट दिली असता मार्गदर्शन करतांना सांगितले.
व्यासपीठावर देवगाव देवळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सोनवणे, महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील,
शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेंद्र पाटील यांनी केले.
नूतन गटशिक्षणअधिकारी रावसाहेब पाटील यांचा सत्कार जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक ,तथा महात्मा फुले हायस्कूल देवगावचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शाल ,श्रीफळ देऊन केला.नंतर
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी जिल्हा परिषद शाळेतील सर्व वर्गांतील शिक्षक, विद्यार्थ्यांची हितगुज साधून मार्गदर्शन केले.आपल्याला गावातील निरक्षर, व शाळा बाहय मूलांचे सर्वेक्षणचे काम प्रामाणिकपणे शिक्षक कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने लवकर करून सर्व कागदपत्रे भरून केंद्रप्रमुखांकडे वेळेत सादर करावेत असे सांगितले.
यावेळी रेखा सोनवणे, रमेश पाटील, राजेंद्र पाटील ,कल्पना साळुंखे, भाऊसाहेब सोनवणे, जितेंद्र शेटे, दीपक सोनवणे, गायत्री पाटील ,महात्मा फुले हायस्कूलचे शिक्षक ईश्वर महाजन,एच.ओ.माळी उपस्थित होते.

[democracy id="1"]