मा.नामदार अनिलदादा पाटील यांचे जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत सत्कार व लाडू तुला

शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा बाजार समितीतर्फे मोफत सुरू करण्याचा आज शुभारंभ

अमळनेर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने अमळनेर चे पहिले नामदार मा.ना.अनिल भाईदास पाटील यांचे जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत सत्कार व लाडू तुला करण्यात येणार असून अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुविधा बाजार समितीतर्फे मोफत सुरू करण्याचा शुभारंभ देखील करण्यात येणार आहे.
अमळनेर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीस प्रथमच नामदार होण्याचा बहुमान मा.ना. अनिल पाटील यांच्या यांच्या निमित्ताने मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर ना. अनिलदादा पाटील यांचे आगमन व जन्मदिवसाच्या निमित्ताने भव्य स्वागत व सत्कार महाराणा प्रताप चौक विश्रामगृह येथे १२ वाजता करण्यात येणार आहे. तर दुपारी ४ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथे अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत अर्ज भरण्याच्या सुविधेसह विमा ही मोफत उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. याप्रसंगी मा.ना.अनिल पाटील यांची “भव्य लाडू तुला” करण्यात येणार आहे. तरी कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे वरील कार्यक्रमांसाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील, उपसभापती सुरेश पिरन पाटील व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.

[democracy id="1"]