अमळनेर बसस्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलिस निंबा शिंदे यांच्या सतर्कमुळे महिलेचे बसमध्ये हरवलेले पावणेतीन लाख रुपये अवघ्या काही वेळेत परत

अमळनेर: बसस्थानकात तैनात पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेचे
बसमध्ये हरवलेले पावणे तीन लाख रुपये अवघ्या काही मिनिटात
परत मिळाले. बसमधीलच दोन प्रवासी महिलांनी आपलीच बॅग
समजून ही बॅग नेली होती. त्यात २ लाख ७५ हजार रुपये होते, हे
त्यांच्या गावीही नव्हते.
चोपडा तालुक्यातील संगीता ताराचंद सोनवणे ही महिला नाशिक
चोपडा बसने चोपड्याकडे निघाली होती. अमळनेर बसस्थानकावर
पाणी पिण्यासाठी खाली उतरली परत आल्यावर तिला बॅग दिसली
नाही. तिने ताबडतोब बसस्थानकात कर्तव्यावर असलेले पोलिस
निंबा शिंदे यांना घटना सांगितली. मात्र, महिलेला बॅग धुळे,
अमळनेर की अन्य कुठे चोरीला गेली हे आठवत नव्हते.
पोलिसाने लागलीच बसस्थानकात चौकशी सुरू केली.
त्याचवेळी त्यांना दोन तीन महिला चार पाच बॅगा घेऊन जात
असताना आढळल्या. शिंदे यांनी त्यांची विचारपूस केली असता
यांनी त्यांची विचारपूस केली असता रंग सारखा असल्याने त्यांनी
एकाच रंगाच्या दोन बॅगा उचलून घेतल्या होत्या. ओळख
पटवण्यासाठी शिंदे यांनी संगीता सोनवणे यांना पोलिस स्टेशनला
नेण्यात आले. बॅगमध्ये त्यांचे पावणे तीन लाख रुपये जैसे थे
पोलिस निरीक्षक विजय शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक
राकेशसिंग परदेशी, हेकॉ. शरद पाटील यांच्यासमक्ष संगीता
सोनवणे यांना त्यांचे पावणे तीन लाख रुपये परत करण्यात आले.
टॅक्सीमध्ये बसवून सुखरूपपणे चोपडा रवाना करण्यात आले.
पोलिसांच्या सतर्कतेने पैसे परत मिळाल्याबद्दल महिलेने पोलिसांचे
आभार मानले.

[democracy id="1"]