डी वाय एस पी सुनील नंदवाळकर साहेबांनी वाचवले तरुणाचे प्राण

माणसातले देव माणूस आदरणीय डी.वाय.एस.पी सुनील नंदवाळकर साहेब

अमळनेर: म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी असाच एक प्रत्यय समोर आला मंदिरावरून दर्शन घेऊन घरी परत जाताना एक अनोळखी तरुण रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे श्री नितीन साळुंखे यांच्याकडून अमळनेर येथील डीवायएसपी सुनील नंदवाळकर साहेबाना समजल्यावर कुठलाही वेळ वाया न घालवता देवा रूपाने जाऊन त्या तरुणास स्वतःच्या गाडीत टाकून दवाखान्यात दाखल करत प्राण वाचविले
बेशुद्ध अवस्थेतील तरुणास ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर प्रथम उपचार केला व पुढील उपचारासाठी धुळे येथे रवाना करण्यात आले. तो इसम बेशुद्ध अवस्थेत असल्यामुळे त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला होता. चौकशी केली असता तो व्यक्ती वसंतनगर तालुका पारोळा येथील असल्याचे समजले डीवायएसपी सुनील नंदवाळकर साहेब व त्यांचे सहकारी कर्मचारी पोलीस नाईक भटुसिंग तोमर,गणेश पाटील, संजय बोरसे,नितीन साळुंखे,यांचे शहरातून सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.

माणसातले देव माणूस देवदूत आदरणीय डी.वाय.एस.पी सुनील नंदवाळकर साहेब
[democracy id="1"]