अर्बन बँकेच्या निवडणुकीत 48.5% मतदान.. आज निकाल

अर्बन बँकेच्या निवडणुकीत 48.5% मतदान.. संचारबंदी मूळे मतदानावर परिणाम.. आज निकाल.. संचारबंदी मुळे ही आहेत बंधने…

अमळनेर: शहरातील प्रतिष्ठित अर्बन बँकेच्या 13 संचालकांसाठी 35 उमेदवारांचे
भवितव्य आज शनिवारी मतपेटीत बंद झाले आहे. एकूण 15 हजार 937 मतदार होते त्यापैकी 7729 मतदारांनी मतदान आज साने गुरुजी शाळेत केले. एकूण 7729 एव्हढे मतदान म्हणजे एकूण 48.5% मतदान झाले.
शहरातील सानेगुरुजी विद्यालयात एकूण 28 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडली.मतदानासाठी 180 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या निवडणुकीत सर्वसाधारण आठ जागांसाठी 14 उमेदवार, महिला राखीव दोन जागांसाठी 04 उमेदवार, इतर मागासवर्गीय एक जागेसाठी 05 उमेदवार, अनुसुचित जाती जमाती एका जागेसाठी 9 उमेदवार तर भटक्या विमुक्त एक जागेसाठी 03 उमेदवार रिंगणात आहेत.

आज रविवारी मतमोजणी


आज दि 11 रोजी इंदिराभवन मध्ये मतमोजणी होणार असून मतमोजणीसाठी 84 कर्मचारी नियुक्त केले आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल.संचारबंदी असल्याने उमेदवार आणि समर्थकांनी गर्दी करू नये म्हणून पोलिस सतर्क राहणार आहेत.संचारबंदी मुळे विजयी उमेदवारांना मिरवणूक काढता येणार नाही.निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व्ही एम जगताप, सुनील महाजन व सुनील पाटील परिश्रम घेतले.

मतदानावर संचार बंदीचा परिणाम

परवा रात्री झालेल्या दंगली नंतर शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. दि 12जून पर्यंत कलम 144 लागू करण्यात आले असून संचारबंदी चा चांगलाच परिणाम मतदानावर झाला आहे. त्यामुळे फक्त 48% मतदान झाले असून पोलिस बंदोबस्त आणि काही मतदार घाबरून मतदानास आले नाही. अर्बन बँकेच्या निवडणुकीत देखील मतदान करण्यासाठी200ते 1000 रू.पर्यंत पैसे वाटप झाल्याच कळते.

[democracy id="1"]