आदिवासी कुटुंबाला रणजित शिंदे यांचा मदतीचा हात

अमळनेर: मंगरूळ येथील आदिवासी कुटुंबियांचे घर जळाल्याचे वृत्त अर्बन बँकेच्या सभासदांच्या भेटीसाठी प्रचारानिमित्त मंगरूळ येथे आलेल्या सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या सहकाऱ्यांना कळले. सदर वृत्त अर्बन बँकेत उमेदवारी करीत असलेल्या रणजित शिंदे यांना सांगितले असता शिंदे यांनी तात्काळ अमळनेर येथून संबंधित कुटुंबीयांना दिड महिन्याच्या जीवनावश्यक वस्तू व किराणा घेऊन आपले शालक गिरीष देवकर व सहकारी मंगरूळ येथिल सहकारी शिक्षक लोकनियुक्त सरपंच सौ हर्षदा पाटील यांचे पती संदिप पाटील यांच्या हस्ते संबंधित कुटुंब प्रमुख सुरेश भिल व कुटुंबातील सदस्यांना पोहचवून सामाजिक दातृत्वाचा परिचय दिला आहे.सदर घटनेत सुरेश भिल यांचे घरातील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्या आहेत.तर निवडणुकीच्या धामधुमीतही सामाजिक भावनेतून सदर कुटुंबियांना शिंदे यांनी केलेली मदत इतरांनाही मदत करण्यास प्रोत्साहित करणारी ठरेल.