प्रशासकीय इमारतीची जागा खाली होण्याबाबत आमदार अनिल पाटील यांनी दिला आंदोलनाचा इशारा

शासकीय अधिकारी झालेत मुजोर,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही ऐकत नाही असा घणाघाती आरोप आमदार अनिल पाटील

अमळनेर : तालुक्यातील महसूल व सर्व विभागाची मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची जागा खाली होण्याबाबत शासकीय अधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचेही ऐकत नाही इतके मुजोर झाले आहेत असा घणाघाती आरोप आमदार अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
प्रशासकीय व महसूल इमारतीस प्रशासकीय मान्यता आणि निधी मंजूर झाला असून नियोजित जागा ही महसूल विभागासाठी देण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह अधिकाऱ्यांच्या बैठकीत पालकामंत्री गुलाबराव पाटलांनी सूचना व आदेश देऊनही इमारतीचे काम सुरू होत नाही याचा अर्थ पालकमंत्र्यांचे अथवा सरकारचे प्रशासन ऐकत नाही असा होतो. मी अनेकवेळा पालकमंत्र्यांकडे गेलो त्यांनी अधिकाऱ्यांना फोन लावले असता काही अधिकारी फोन घेत नाही अथवा कामे ऐकत नाहीत. सर्वसामान्य जनतेला बसस्थानक पासून जवळ व एकाच ठिकाणी सर्व शासकीय कार्यालये एकत्र असतील अशी सुविधा होणार आहे. मात्र हे काहींना पचत नसून यामागे राजकारण घुसले आहे. नागरिकांची गैर सोय करणारा झारीतील शुक्राचार्य कोण ? असा सवालही आमदार अनिल पाटील यांनी केला आहे. इमारत त्याच ठिकाणी व्हावी अशी आमची मागणी कायम राहील त्यासाठीच १२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असून त्यानंतर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जातील असाही इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे.

[democracy id="1"]