प्रगणे डांगरी येथील न्यू इंग्लिश स्कूलचा  दहावीचा शंभर टक्के निकाल: मुलींनी मारली बाजी

अमळनेर – ग्राम विकास शिक्षण मंडळ, मारवड. संचलित न्यु. इंग्लिश स्कूल, प्र. डांगरी येथे इ.10 वी मार्च 2023 चा निकाल 100.00 % लागला असुन इ. 10 वी च्या परीक्षेत कु. पाटील रोहिणी लक्ष्मण हिने 91.00 % गुण मिळवुन प्रथम क्रमांक तर कु. कुमावत मयुरी संभाजी 89.00% गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर कु. भोई नंदनी युवराज हिने 88.80 % गुण मिळवुन तृतिय क्रमांक प्राप्त केला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचे ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड येथील अध्यक्ष श्री.आबासो.जयवंतराव पाटील व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

[democracy id="1"]