प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पंधरा दिवसात सुरू न झाल्यास उपोषणाचा दिला इशारा आमदार अनिल पाटील

पोलिसांनी ताबा देऊन 15 दिवसात बांधकाम सुरू न झाल्यास उपोषणाचा इशारा

अमळनेर : प्रशासकीय इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून येत्या पंधरा दिवसात पोलिसांनी जागा खाली करून इमारतीचे बांधकाम सुरू न झाल्यास १२ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच उपोषणाला बसण्याचा इशारा आमदार अनिल पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
आमदार अनिल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , शहरातील जुन्या पोलीस वसाहतीतील टी पी ६६-६७ मध्ये प्रशासकीय इमारत बांधण्याचा कार्यरंभ आदेश देखील देण्यात आलेले आहे. आणि जिल्हाधिकारिनी प्रशासकीय इमारतीसाठी जागा वितरित केली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आढावा बैठकीत २६ जानेवारी २०२३ रोजी काम सुरू करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. पोलिसांना नवीन वसाहतीत घरे बांधून देण्यात आली आहेत. त्याठिकाणी घरे रिकामी आहेत. तरी देखील जिल्हाधिकारिनी जागा रिकव्हर का केली नाही. जुनी वसाहत जीर्ण होऊन पोलिसांच्या जीविताला धोका आहे आणि नवीन वसाहतीत घरे रिकामी आहेत. तसेच पोलीस विभागाला जागा खाली करण्याचा आदेश देऊनही पोलीस विभागाने प्रतिसाद दिलेला नाही. उच्च न्यायालयाचा आदेश आणि जिल्हाधिकारीचा आदेश असूनही आदेशाचे पालन होत नाही हा जिल्हाधिकारी आणि उच्च न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे १२ जूनपर्यंत जागा खाली होऊन काम सुरू न झाल्यास तालुक्यातील नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत उपोषणास बसणार आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवल्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही आ. अनिल पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला असून निवेदनाच्या प्रति पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत.

[democracy id="1"]