प्रताप महाविद्यालय आणि 49 बटालियनने नदी पात्र स्वच्छ करण्याची मोहीम घेतली हाती

अमळनेर : महिनाभराचा संत सखाराम महाराज यात्रोत्सव संपला आणि दुकानदारांनी यात्रेत केलेली घाण स्वच्छ करण्यासाठी प्रताप महाविद्यालय व एनसीसी ४९ बटालियन पुढे आले.
बोरी नदीच्या पात्रात संत सखाराम महाराज यात्रा भरते. शेकडो दुकानदारांनी आपली दुकाने थाटली होती. पण यात्रा संपताच दुकानदारांनी आपला पसारा आवरला मात्र प्लास्टिक कचरा आणि घाण तशीच पडली होती. खानदेश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ अनिल शिंदे , व्हॉ चेअरमन प्रदीप अग्रवाल यांनी प्राचार्य डॉ ए बी जैन यांच्यशी चर्चा करून नदी पात्र स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली. महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि २०१ एनसीसी कॅडेट यांनी परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. यावेळी उपप्राचार्य जी एच निकुंभ , उपप्राचार्य डॉ कल्पना पाटील , भगवान पाटील , ४९ महाराष्ट्र बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल समीर बोरस ,सुभेदार मेजर धर्मवीरसिंग ,सुभेदार मेजर सोनप्रकाश , हवालदार उमेश भगत , प्रदीप पंत ,विक्रम निकम हजर होते.