डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल 99 टक्के ——

निकालाची परंपरा कायम —

पारोळा : वसंतनगर ता. पारोळा येथील डी. डी. नाईक उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा निकाल 99 टक्के लागला. गेल्या 13 वर्षापासून या जुनियर कॉलेजचा निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
यात यावर्षी 12 वी विज्ञान विभागात प्रथम रितेश हेमंत जाधव (71.83) टक्के, द्वितीय विशाल सीताराम पाटील (71.33) टक्के, तृतीय रोशनी गणेश जाधव (70.67) टक्के, चतुर्थ कुलदीप गणेश पाटील (69.17) टक्के, पाचवा क्रमांक वैशाली सोमनाथ जाधव (69.17) टक्के मिळाले आहेत. यावर्षी विज्ञान शाखेला एकूण 74 विध्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी 73 विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षी निकालात यश टिकवून ठेवल्याने संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्राचार्य सी. के. पोतदार, मुख्याध्यापक सोपान पाटील, वसंतनगर, भोलाणे, पिंपळकोठा येथील ग्रामस्थ यांनी सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचे व इयत्ता बारावी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

[democracy id="1"]