करणखेडा येथे वि.या. पाटिल माध्यमिक विद्यालयात आज होणार निरोप समारंभ…

मारवड ता. अमळनेर – येथील ग्रामविकास शिक्षण मंडळ संचलित वि. या. पाटील माध्यमिक विद्यालय करणखेडा येथील मुख्याध्यापक श्री पुरुषोत्तम सोनवणे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप व सत्कार समारंभ आज सकाळी 10 वाजता करणखेडा येथील माध्यमिक शाळेत आयोजित केला आहे या कार्यक्रमास माननीय श्री आमदार सत्यजित तांबे साहेब माननीय आमदार दादासो अनिल भाईदास पाटील माननीय श्री डॉक्टर नितीनजी बच्छाव साहेब शिक्षणाधिकारी माध्यमिक जळगाव हे अतिथी म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहे. ग्राम विकास शिक्षण मंडळ मारवड हे पंचक्रोशितील नावाजलेले व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी कटिबद्ध आहे. अशाच वि या पाटील माध्यमिक विद्यालयातून मुख्याध्यापक श्री पुरुषोत्तम सोनवणे हे सेवानिवृत्त होत असल्याने विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेले आहेत.

[democracy id="1"]