अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पंकज आशिया यांच्याशी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना

अमळनेर: जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी काल दि.15 मे 2023 रोजी दुपारी 4.30 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. देवेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होऊन सविस्तर चर्चा केली.
सदर बैठकीत नवीन मोबाईल फोन पुरविणे, लाभार्थ्यांसाठी येणारे कच्चे धान्य शिजवण्यासाठी साहित्य (गॅस, पातेले,बादली आदी) उपलब्ध करून देणे,थकीत गणवेश निधी, सादिल खर्च,मोबाईल प्रोत्साहन भत्ता,सीबीई कार्यक्रम निधी, प्रवासभत्ते बिल,मोबाईल रिचार्ज आदी रकमा अदा करणे, निकष पूर्ण करत असलेल्या मिनी अंगणवाडी केंद्राचे नियमित अंगणवाडी केंद्रात रुपांतर करणे, तसेच मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांचे पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करणे.पीएफएमएस प्रणाली मार्फत मानधन न मिळणे.
आदी प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.जिल्हा स्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात येतील,अंगणवाडी केंद्रासाठी गाव पातळीवर आराखड्यानुसार निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना आदेशित केले जाईल.त्यासाठी अंगणवाडी सेविकांनी ग्रामपंचायत रितसर लेखी मागणी करावी असेही श्री.आशिया यांनी सुचित केले तसेच कच्च्या आहाराचा दर्जा सुधारण्यासंबंधी शासन स्तरावर पत्रव्यवहार करण्यात येईल तसेच नवीन मोबाईल फोन आणि वरील थकीत रकमांसाठी शासनाकडे तात्काळ निधीची मागणी करण्यात येईल.असे प्रतिपादन श्री.आशिया यांनी बैठकीत केले.
सदर बैठकीत जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. देवेंद्र राऊत यांच्यासह राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.संजय धनगर,श्रीमती अर्चना आटोळे,शैलजा पाटील,श्रीमती सावंत आणि अन्य संघटनेचे पदाधिकारी सहभागी होते. अशी माहिती रामकृष्ण बी.पाटील यांनी दिली.

[democracy id="1"]