विविध मागण्यांसाठी व्हाईस ऑफ मिडिया अमळनेर तालुका करणार धरणे आंदोलन

पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी करणार धरणे आंदोलन

अमळनेर: राष्ट्रीय पातळीवर काम करणारी व्हाईस ऑफ मीडिया संघटना उद्या दि.११ मे रोजी सकाळी १० वाजता तहसिल कार्यालय अमळनेर येथे धरणे आंदोलन करणार आहे. लोकशाहीचा चौथा खांब हा पत्रकार असतो.परंतु या वंचित घटकाला न्याय मिळत नाही, याकरिता जिल्हाध्यक्ष सुरेश उज्जेनवाल व कार्याध्यक्ष विकास भदाणे,डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही मार्गाने हे आंदोलन केले जाणार आहे.
मागण्या
१) पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करुन त्याला भरीव निधी द्यावा. २) पत्रकारितेत ५ वर्ष पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. ३) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागु असलेला जीएसटी रद्द करावा. ४) पत्रकारांच्या घरांसाठी म्हणून विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा. ५) कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर चा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे. ६) शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग दैनिके (लघु दैनिक) यांना मारक आहे. लघु दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात.
अशा विविध मागण्यांसाठी तहसिलदार यांना निवेदन दिले जाणार आहे.तरी अमळनेर तालुका व्हाईस ऑफ मिडिया सर्व पदाधिकार्यांनी धरणे आंदोलनाला उपस्थिती द्यावी असे आवाहन व्हाईस ऑफ मिडियाचे अमळनेर तालुका अध्यक्ष अजय भामरे, सचिव जितेंद्र पाटील, कोषाध्यक्ष रविंद्र मोरे, उपाध्यक्ष राहुल पाटील,संघटक सचिन चव्हाण, विनोद कदम व ईश्वर महाजन आदी पदाधिकार्यांनी केले आहे.

[democracy id="1"]