यात्रे निमित्त बोरी नदी पात्रात राबवले जाणार प्लास्टिक मुक्त अभियान

अमळनेर: येथील बोरी नदी पात्रात भारत सरकार युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय रा.से.यो. क्षेत्रीय निर्देशालय पुणे (महाराष्ट्र,गोवा) राष्ट्रीय सेवा योजना स्वच्छता ॲक्शन प्लॅन एक दिवसीय सफाई अभियान दिनांक ०६/०५/२०२३रोजी सकाळी ठीक ६:० वाजता श्री. संत सद्गुरु सखाराम महाराजांच्या ( अमळनेर) यात्रे निमित्त बोरी नदी पात्रात प्लास्टिक मुक्त अभियान राबवले जाणार आहे. या उपक्रमात सक्रिय सहभागी होण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. राष्ट्रीय सेवा योजना विभागा च्या वतीने महाशय कुलगुरू व्ही. एल.माहेश्वरी,राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य श्री.राजुजी नन्नवरे तसेच रा.से.यो. संचालक प्रा.डॉ. सचिनजी नांद्रे व जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. मनीष करंजे, डॉ. संजय शिंगाणे डॉ.जगदीश सोनवणे यांनी बोरी नदीच्या परिसरात स्वच्छतेसाठी या उपक्रमात सहभागी होण्याचे पर्यावरण प्रेमींना आवाहन केले असून आपली वसुंधरा प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केलेला आहे. या संकल्पात प्रत्येकाने सहभागी होऊन प्लास्टिक मुक्त भारत करूया. या उपक्रमात राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय पारोळा, किसान महाविद्यालय पारोळा, धरणगाव महाविद्यालय, चोपडा महाविद्यालय ,प्रताप महाविद्यालय ,धनदाई महाविद्यालय,पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व कला महाविद्यालय मारवड आदी सहभागी होणार आहेत.