वकृत्व जनसंवादाचे प्रभावी माध्यम प्रा.डॉ.लीलाधर पाटील

अमळनेर:वक्ते जन्माला येत नाही ,घडावे व घडवावे लागतात, तर वाचन हा वक्तृत्वाचा आधार आहे .वकृत्व हे जनसंवादाचे प्रभावी माध्यम असून व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय वक्ते प्रा.डॉ.लीलाधर पाटील यांनी वक्ता प्रशिक्षण शिबिरात केले ते शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. युवा कल्याण प्रतिष्ठानअमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवात दोन दिवशीय वक्ता प्रशिक्षितअमळनेर येथे धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत हॉलमध्ये आयोजित केले होते .74 विद्यार्थी व सीनियर प्रशिक्षणाथी शिबिरात उपस्थित होते.
धनदाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ प्रमोद पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले अध्यक्ष स्थानी नानासाहेब डीडी पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा डॉ किशोर पाटील होते. प्रा.अशोक पवार यांनी महापुरुषांच्या विचारांच्या प्रचारासाठी वक्त्यांची गरज व शिबिराचा उद्देश स्पष्ट केला . सूत्रसंचालन बापूराव ठाकरे व प्रेमराज पवार यांनी केले. शिबिरात वकृत्व म्हणजे काय, स्पर्धात्मक वकृत्व, सादरीकरणाचे महत्त्व , वक्ता आणि ताण तणाव व व्यवस्थापन कौशल्य, समूहाचे मानसशास्त्र ,गटचर्चा व सादरीकरण इत्यादी विषयावर शिबिरात मार्गदर्शन झाले .ज्येष्ठ पत्रकार व वक्ते राजू महाले सरांनी शिबिरार्थींना आपल्या व्याख्यानातून खूप प्रभावित केले. शिबिरार्थींच्या सादरीकरण प्रसंगी रामेश्वर भदाणे व संदीप घोरपडे या नामवंत वक्त्यांनी परीक्षक म्हणून उत्तम काम केले व मार्गदर्शनही केले. शिबिरात दुपारचे भोजन योगेश मुंदडे व प्रशांत सरोदे यांचे कडून देण्यात आले. अभियानाच्या वतीने अमळनेर तालुका पातळीवर 11 जून 23 रोजी वक्तृत्व स्पर्धा जाहीर करण्यात आली.
वक्ता प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी मिलिंद निकम, डी ए पाटील सर ,बापूराव ठाकरे ,प्रेम राज पवार, डॉ. राहुल निकम, अजय भामरे, चेतन जाधव ,अशोक पाटील ,संजय सूर्यवंशी ,गौतम मोरे ,वैशाली शेवाळे, सोपान मोरे ,व धनदाई महाविद्यालयाचे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

[democracy id="1"]