अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडी चा विजय

महाविकास आघाडी १४ तर भाजप ४ तिन्ही अपक्ष उमेदवारांचा मविला पाठिंबा

अमळनेर: कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचे पॅनल बहुमतात निवडून आले असुन कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीचे ११ उमेदवार भाजप ४ उमेदवार , अपक्ष ३ उमेदवार विजयी झाले आहेत अपक्ष उमेदवारांनी महाविकास आघाडीला पाठीबा दिला आहे असे आमदार अनिल दादा पाटील यांनी अटकाव न्यूज शी बोलताना सागितले. तिन्ही अपक्ष उमेदवारांनी मविआला पाठिंबा दिला असून मविआने अमळनेर बाजार समितीत १४ जागावर विजय मिळवत आपला झेंडा लावला आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीने आपला झेंडा लावला असून विद्यमान आमदार अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव दादा पाटील यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सहकार पॅनलला अकरा जागा तर भाजपतर्फे माजी आमदार स्मिता ताई वाघ व माजी आमदार शिरीष दादा चौधरी माजी आमदार डाँ बी एस पाटील यांच्या नेतृत्खावाली असलेल्या पॅनलला चार जागेवर विजय मिळवुन समाधान मानावे लागले आहे.तसेच अपक्ष म्हणून एक जागा विजयी झाली आहे.तर व्यापारी मतदार संघाचे दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत ते पुढील प्रमाणे आहेत..
पुरुष व महिला राखीव सोसायटी मतदारसंघातून अशोक आधार पाटील -७२१, प्रा.सुभाष पाटील -६५६ सुरेश पिरण पाटील -५०७, डॉ.अशोक हिम्मत पाटील-४२१ भोजमल मालजी पाटील -३९४ स्मिताताई उदय वाघ-७२६ अपक्ष नितीन बापूराव पाटील -४०९. सुषमा ताई देसले – ६३४, पुष्पा ताई पाटील -५९३. सेवा सहकारी वि जा भ ज मतदार संघातून समाधान धनगर – ६०३. इतर मागास वर्गीय मतदार संघ- डॉ अनिल शिंदे -७२२ ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघ प्रफुल्ल पाटील – ५०६ सचिन पाटील – ५१०. ग्राप आर्थिक दुर्बल मतदार संघ हिरालाल पाटील – ४८१ ग्राप अनुसूचित जाती जमाती मतदार संघ भाईदास भिल – ४३३. हमाल मापाडी मतदार संघ शरद पाटील – १९५ हे विजयी झाले आहेत व्यापारी मतदार संघाचे अपक्ष वूषभ पारेख, प्रकाश अमूतकर दोन उमेदवार हे बिनविरोध झालेले आहेत तसेच अपक्ष- नितीन बापूराव पाटील हेही अपक्ष निवडून आले असून त्यांनीही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे . कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर येथे महाविकास आघाडीने आपला झेंडा लावला आहे