संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट १ मे पासून जाणार बेमुदत संपावर ….

वृद्धांना आधार देणारेच झाले निराधार…! तीन महिण्यापासून रखडले मानधन….

अमळनेर : जळगाव जिल्ह्यातील वृध्दांसाठी अहोरात्र काम
करणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांचे गेले तीन महिन्यांपासून मानधन रखडले आहे. अशातच मानधना बाबत व इतर समस्यांचे शासन स्तरावरील महोदयांकडे निवेदने आणि आपबिती सांगूनही दुर्लक्ष केले जात असल्याने ‘वृद्धांना आधार देणारेच झाले निराधार त्यामुळे १ मे २०२३ पासून जळगाव जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत संप पुकारनार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना सादर करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना,कुटुंब आर्थिक सहाय्य लाभार्थी योजना व इतर वरिष्ठांनी सांगितलेली अशी अनेक कामे आय टी असिस्टंट यांना करावी लागतात. अनेक वर्षांपासून निराधारांसाठी आधार असलेले आय टी असिस्टंट तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. याच भरवशावर अनेकांचा संसार सुरू होऊन व परिवार वाढीस लागला असून,संसाराचा गाढा हाकण्यास कसे- तरी चालढकल करून जीवन जगत आहेत. अशातही मानधन रखडले जात असेल तर याला काय म्हणावे? झोपलेल्या प्रशासनास कितीवेळा जागे
करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.’नियमित कर्मचारी तुपाशी आणि मानधन वा कंत्राटी कर्मचारी उपाशी’ अशी हल्ली परिस्थिती निर्माण झाली आहे.नियमित कर्मचाऱ्यांपेक्षा कंत्राटी कर्मचारी वर्गांकडून शासकीय कामे सर्वात जास्त करवून घेतली
जात आहेत.त्यामुळेच शासन तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी वर्गांची भरती करतांना दिसून येत आहे. कंत्राटी कर्मचारी वर्गांची भरती करण्यात तर येतआहे;मात्र समान काम समान वेतनही लागू करणे तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी कित्तेक वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट
लढा देत आहेत. मात्र शासन स्तरावरून कुणी लक्ष देयाला तयार नाही यासाठी १ मे २०२३ पासून महाराष्ट्रातील व जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण संजय गांधी निराधार योजनेतील आय टी असिस्टंट मुंबई येथील आझाद मैदानावर योगेश बाळदे (अमळनेर )यांच्या अध्यक्षतेखाली उपोषनास बसणार आहेत.

त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे
1) आयटी असिस्टंट यांना शासनात घ्यावे.
२) समान काम समान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावे.
३) तीन महिन्यापासून रखडलेले वेतन तात्काळ द्यावे

[democracy id="1"]