गलवाडे रस्त्यावर ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

अमळनेर-शहरातील दाजीबा नगर परिसरातून मोटरसायकल ने घरी परत जाणाऱ्या तरुणाचा गलवाडे रस्त्यावर तालिमी जवळ मिनी ट्रक ला जोरदार धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
ख्वाजा नगर भागातील २४ वर्षीय युवक आदिल रफिक खाटीक हा शुक्रवारी दि.२८/०४/२३ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घरी परत जात असताना, गलवाडे रस्त्यावर तालीम जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिल्याने तो जागीच गतप्राण झाला ,घरातील कर्त्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने खाटीक परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

[democracy id="1"]