अमळनेर:काल दुपारी साडेतीन वाजेपासून विजांचा कडकडात सह वादळी पाऊसला सुरुवात झाली असून या अवकाळी पावसाने ग्रामीण भागात शेकडो झाडे उन्मळून पडली,अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची चांगलीच फजीती उडाली.
अमळनेर तालुक्यात काही गावामध्ये काल दुपारी वादळी पाऊस सह गारपीट झाल्यामुळे शेकडो झाडे पडल्याने विजेचे खांब ,तारा तुटून वीज पूरवठा खंडित झाला होता ,या पावसाने काल तालुक्यातील कलाली ,सात्री ,करणखेडे निंभोरा आदी ठिकाणी विजांचा कडकडात सह वादळ आणि गारपीट झाली. सात्री येथे जागेश्वर मंदिराचे पत्रे उडाली तर केळीचे नुकसान झाले. तसेच निंभोरा येथे घरावर झाड पडले मात्र जीवित हानी झाली नाही. गंगापुरी येथे देखील वादळी पावसाने विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. मारवड रस्त्यावर धानोरा फाट्यावर झाड पडल्याने बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.अखेर नागरिक व पोलिसांच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला. या अवकाळी पावसामुळे तालुक्यात अनेकांची घाबरगुंडी उडाली होती.