पैलाड भागातील बोरी नदीकाठालगत रस्ता काँक्रीट करण कामाचे आमदार अनिल दादा पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ…

अमळनेर:शहरातील वाढती लोकसंख्या व झपाट्याने होणारे शहरीकरण यामुळे अमळनेर शहरातील वाहतुकीवर मोठा परिणाम होत असल्याने दरवर्षी लग्नसराईत तसेच यात्रोत्सवाच्या काळात शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे नागरिकांना भरपूर त्रासाला सामोरे जावे लागत होते. सदर वाहतुकीची कोंडी कायमची सोडवण्यासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार *कृषीभूषण साहेबरावदादा पाटील* यांनी दूरदृष्टी ठेवत स्व- संकल्पनेने *रुबजी नगर ते गांधलीपुराच्या* शेवटच्या टोकापर्यंत पश्चिम भागाकडे नदी काठालगत *संरक्षक भिंतीचे, गटारीचे तसेच काँक्रीट रस्त्याचे* काम करून नदीतील अस्वच्छ सांडपाण्याची व रहदारीची समस्या कायमस्वरूपी सोडवली. त्याच धर्तीवर माजी आमदार *साहेबरावदादा पाटील* यांनी नगरपालिका निधीतून पैलाड भागाकडील पूर्वेकडच्या नदी काठावर *मोठ्या पुलापासून ते मातंगवाड्यापर्यंत* संरक्षक भिंतीचे गटारीचे तसेच मुरूम सह रस्ता भरावाचे काम लोकनियुक्त नगराध्यक्षा *जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील* यांच्या कार्यकाळात पूर्ण केलेले होते. सदर रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण होते. ते काम पूर्ण करण्यासाठी नगरसेविका *संगीता संजय पाटील* व माजी नगरसेवक *संजय कौतिक पाटील* यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री *ना.श्री.गुलाबरावजी पाटील* यांना वेळोवेळी पत्रव्यवहार व पाठपुरावा करत सदर कामाला मंजुरी मिळवली. सदर काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ दिनांक *26 एप्रिल 2023* रोजी संध्याकाळी 5 :30 वाजता अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार *अनिलदादा पाटील* यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार *दादासाहेब कृषीभूषण साहेबराव पाटील* होते. सदर रस्त्याचा परिसरातील नागरिकांना तसेच *श्रीसंत सखाराम महाराज यात्रोस्तवातील भाविकांना* आपले वाहन लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याने त्यांनी सदर कामाबद्दल आनंद व्यक्त केला.

सदर कार्यक्रमाला माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील, नगरसेविका संगीता संजय पाटील, नगरसेवक संजय महादू भिल, पैलाड भागातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र नवल पाटील, संजय भिला पाटील, भगवान पाटील, नरेंद्र पाटील, अरुण हिलाल पाटील, सुनील देवरे, ऋषिकेश पाटील, जितू भाऊ कटारिया, इंजिनीयर अमोल भामरे, डिगंबर वाघ, कंत्राटदार आनंद वैद्य, विश्वास संतोष पाटील ,(बाळु पाटील)विकास पाटील विजय पाटील, मच्छिंद्र ओतारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

[democracy id="1"]