आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक आधार पाटील “समाज भूषण पुरस्काराने’ सन्मानित

अमळनेर: अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे मानवता बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने २०२३ या वर्षाचा “समाज भूषण पुरस्कार’ साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध व जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांचे हस्ते लोण येथील आधार फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक आधार पाटील यांना मान्यवरांच्या उपस्थितीत
समारंभपूर्वक देऊन गौरविण्यात आले.
अमळनेरसह अशोक पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक,शेती क्षेत्रासह ग्रामिण भागात आपल्या दातृत्वातून अल्पावधीतच आपला ठसा उमटविला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन नुकतेच त्यांना समाज भुषण पुरस्कार सन्मानपत्र, गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले. अशोक पाटील यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

[democracy id="1"]