हिंदू मुस्लिम बांधवांनी अमळनेर शहरामधे इफ्तार पार्टीत दिला पूर्ण एकतेचा संदेश….

अमळनेर :  पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने अमळनेर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन जुनी पोलीस लाईन पाचपावली देवी मंदिरा जवळ करण्यात आले. आपले मुस्लिम समाज बांधव यांचा रमजान महिन्यात रोजा- उपवास असतात.त्या निमित्ताने हिंदू मुस्लिम समाजची एकजुट म्हणून काल गुरुवार दिनांक २०-०४-२३ रोजी संध्याकाळी ०७:०० वाजता जुनी पोलीस लाईन पाचपावली मंदिरा जवळ करण्यात आले होते.

यावेळी सदर इफ्तार पार्टीला अमळनेरचे आमदार श्री.अनिल दादा पाटील,तसेच मा. एम राज कुमार साहेब पोलीस अधीक्षक, जळगांव,श्री.रमेश चोपडे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव, श्री. राकेश जाधव साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी अमळनेर व श्री. विजय शिंदे साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमळनेर हे व्यासपीठावर उपस्थित होते.हिंदू मुस्लिम बांधवांनी गुण्यागोविंदाने राहावे, आपापल्या धर्माचा सण उत्साहात साजरा करावा, कोणत्याही धर्माच्या सणाचा द्वेष करू नये. दोन धर्मात तेढ निर्माण होणार नाही, व शहरात शांतता नांदेल यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी राष्ट्रीय एकोपा वाढवावा असे पोलीस अधीक्षक श्री. एम राज कुमार साहेब यांनी सांगितले.


आमदार अनिल भाईदास पाटील म्हणाले की आमदार अनिल भाईदास पाटील म्हणाले की सखाराम महाराजांचा यात्रा उत्सव प्रसंगी रथला मोगरी लावण्यासाठी मुस्लिम बांधवांना मान मिळतो. त्यामुळे यात्रा रथ उत्सवात सर्व समाज बांधवांचे सहकार्य मिळत
असते. यात्रा उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडत
नाही यासाठी सर्व समाजातील बांधवांचे व पोलिसांचे
सहकार्य लाभते. याप्रसंगी मुस्लिम बांधवांना रमजान सणाच्या
हार्दिक शुभेच्छांचा संदेश दिला.


अमळनेर शहरातील विविध धर्मीयांच्या समाजबांधवांनी उपस्थितीत राहून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला गेला. शहरात शांतता नांदावी व सर्वाचे आरोग्य चांगले सुदृढ आरोग्यदायी राहावे यासाठी सामूहिक दुआ पठण यानिमित्ताने करण्यात आले. रोजा इफ्तार झाल्यानंतर मौलाना यांनी नमाज पठण केले. त्यानंतर सर्व रोजेदार व उपस्थित पदाधिकार्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. तसेच विविध धर्मीय पदाधिकार्यांनी मुस्लीम बांधवांना रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्यात .यावेळी शहरातील माजी आमदार , नगरसेवक बंधू तसेच सर्व प्रतिष्ठित नागरिक विविध संस्थाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टी झाली. अमळनेर शहराचे सर्व पोलीस कर्मचारी बांधव उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. शरद दादा पाटील यांनी केले.

[democracy id="1"]