राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेत मारवड महाविद्यालयाला सुवर्णपदक

मारवड, येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित, कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयात, गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगांव द्वारा आयोजित “राज्यस्तरीय गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन” करण्यात आले होते.
गांधी विचार संस्कार परीक्षेत महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. त्यात प्रथम वर्ष कला वर्गाची विद्यार्थिनी कु. नाजमीन पठाण या विद्यार्थिनीला सुवर्णपदक प्राप्त झाले. या कार्यक्रमाप्रसंगी गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक डॉ. सतीश पारधी यांनी गांधी विचार संस्कार परीक्षेची कार्यपद्धती व आपली भूमिका मांडून महात्मा गांधीजींच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी कु. नाजमीन पठाण हिचा सुवर्णपदक प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव केला. तसेच महाविद्यालयातील गांधी विचार संस्कार परीक्षेचे समन्वयक प्रा. डॉ. सतीश पारधी यांची “राज्यस्तरीय परीक्षा कार्यकारी समिती सदस्यपदी नेमणूक” झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. सत्कार मुर्ती कु. नाजमीन पठाण हिने गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगांव व महाविद्यालयाचे आभार व्यक्त करून, म. गांधींचे तत्त्वज्ञान संपूर्ण विश्वाला प्रेरणादायी असल्याचे मत मांडले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. वसंत देसले यांनी, विद्यार्थी जीवनात सत्य, अहिंसा यांचा अंगीकार करून देशासाठी आपली सेवा द्यावी असा मोलाचा संदेश आपल्या मनोगतातून दिला. तसेच दरवर्षी गांधी रिसर्च फाउंडेशन ने गांधी विचार संस्कार परीक्षांचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. माधव वाघमारे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारधारेच्या आधारावर व ग्रामोद्योगाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करण्याचे काम विद्यार्थ्यांनी भावी जीवनात करावे.

ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आबासो. जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष आबासो. श्री. देविदास शामराव पाटील,सेक्रेटरी आबाजी श्री. देविदास बारकू पाटील तसेच सर्व संचालक मंडळ यांनी सुवर्ण पदक विजेती कु. नाजमीन पठाण हिचे व प्रा. डॉ. सतिश पारधी यांची राज्यस्तरीय गांधी विचार परीक्षा कार्यकारी समिती सदस्यपदी नेमणूक” झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक – प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन इतिहास विभागप्रमुख प्रा. डॉ. दिलिप कदम यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.