किसान महाविद्यालयातील भाषा विभागाच्या वतीने शैक्षणिक सहल चे आयोजन

पारोळा:( प्रतिनिधी) अभ्यासक्रम व्यतिरिक्त विविध भाषिक तसेच साहित्यिक दृष्टिकोनाशी सांगड घालण्यासाठी किसान महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी (भाषा विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने चाळीसगाव येथील राष्ट्रीय महाविद्यालय चाळीसगाव येथे भाषा प्रयोगशाळा व देशातील प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या कलामहर्षी के. के. मूस यांच्या कलादालनाला भेट दिली. सोबतच चाळीसगाव जवळील निसर्गरम्य तसेच धार्मिक स्थळ म्हणून ओळख असलेल्या पाटणादेवी या ठिकाणी देखील भेट दिली.
राष्ट्रीय महाविद्यालय चाळीसगाव येथील इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. विजय शिरसाठ यांनी आपल्या भाषा प्रयोगशाळा बद्दलची महत्वपूर्ण माहिती तृतीय वर्ष विभागातील विद्यार्थ्याना दिली. त्यात भाषा कौशल्य आत्मसात करण्यासाठी विविध उपलब्ध असलेले भाषा साठी असलेल्या सॉफ्टवेअर ची माहिती सांगितली. सध्याच्या येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरण मधील कौशल्य आधारित शिक्षणासाठीचा उपयोगाबद्दल देखील अद्यावत केले. सोबतच महाविद्यालयातील निवृत्त प्रा. डॉ. एस. डी. महाजन यांचे देखील मार्गदर्शन लाभले.
चाळीसगाव शहरातील जगप्रसिद्ध चित्रकार तसेच शिल्पकार म्हणून ओळख असलेल्या केके मूस यांच्या विविध कलाकृतीच्या बाबतीत तेथील सेवक श्रीमान यांनी अविस्मरणीय अशी माहिती दिली. थोडक्यात केके मुसांचे चित्रकार म्हणून जीवन चित्रीत केले. त्यांच्या आयुष्यातील प्रेमाचे प्रसंग देखील सांगितले. या कलादालनाला देशातील पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि देश व विदेश पातळीवरील मोठ्या व्यक्तींची भेटीबद्दल माहिती दिली.
या सहलीसाठी तीनही भाषा विभागातील विभाग प्रमुख डॉ. माणिक बागले, डॉ. सविता चौधरी आणि डॉ.मंगल बाविस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहल यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी विभागातील सहकारी प्रा. अविनाश अहिरे, प्रा. प्रमोद चौधरी, प्रा. जिविका जोगी मॅडम, डॉ. ज्ञानेश्वर भोई , प्रा. गोविंद वसावे यांनी प्रयत्न केले. सहलीसाठी योग्य ते सहकार्य महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. वाय.व्ही.पाटील ,उपप्राचार्य डॉ. जी.एच.सोनवणे यांनी भाषा विभागातील शैक्षणिक सहलसाठी शुभेच्छा दिल्यात.महाविद्यालयातील अशा नवनवीन उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री डॉ. सतीशराव पाटील यांनी कौतुक केले.
????????

[democracy id="1"]