अमळनेर येथे विद्याभारतीच्यावतीने होणाऱ्या प्रशिक्षण वर्गाच्या व्यवस्थेची आढावा बैठक सम्पन्न…

नवीन शैक्षणिक धोरणरावर चालणार प्रशिक्षण

अमळनेर: दि.१७ एप्रिल रोजी प्रताप महाविद्यालयाच्या प्रताप तत्वज्ञान केंद्रात विद्याभारतीच्या प्रांत अभ्यास वर्गाची बैठक संपन्न झाली. अभ्यास वर्गासाठी ३ ते १३ मे दरम्यान संघ दृष्ट्या देवगिरी प्रांतातील बीड,परभणी,जालना,संभाजीनगर,जळगाव,धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील अंगणवाडी, पूर्व प्राथमिक,माध्यमिक शिक्षक-शिक्षिका व पालक उपस्थित राहणार आहे. दहा दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गाच्या व्यवस्थेची आढावा बैठक घेण्यात आली.स्वागत समितीच्यावतीने सर्व नियोजन करण्यात येणार आहे. त्यावेळी प्रांतमंत्री प्रकाश पोतदार, जिल्हाध्यक्ष प्रा.दिलीप भावसार, जिल्हामंत्री प्रदीप गुजर,राजेंद्र निकुंभ,जेष्ठ स्वयंमसेवक बजरंग अग्रवाल,खा.शि.मंडळ कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडे, प्रा.धीरज वैष्णव,राकेश शर्मा, दिनेश पालवे, पवन पाटील, रतिलाल बाविस्कर, दत्तात्रय नाईक, संजय शेटे ,प्रा. सतीश करंजे,प्रा. ज्ञानेश्वर मराठे, निनाद जोशी, संकल्प वैद्य, विजय सूर्यवंशी, बापूराव महाजन,अतुल सोनवणे, सागर बारी, अनिल महाजन , सुनील महाजन, चेतन जाधव, प्रशांत कुडे, मिलिंदकुमार बोरवले उपस्थित होते.

[democracy id="1"]