तलाठीसह महिला कोतवालास भोवली १५००/- रुपयाची लाच
भडगाव [ प्रतिनिधी ] :भडगाव तालुक्यातील भोरटेक बू. येथे सातबारा उताच्यावर वारसांचे नाव लावण्यासाठी १हजार ५०০ रूपयांची लाच घेणाऱ्या तलाठी कार्यालयातील तलाठीसह महिला कोतवालास लाचलुचपत विभागाच्या पथकाने शुक्रवारी १४एप्रिल रोजी रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. हि कारवाई डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीलाच झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.तक्रारदार हे भडगाव तालुक्यातील भोरटेक बू. येथील रहिवाशी असून, त्यांच्याकडे वडीलोपार्जीत जमीन आहे. या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लावण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. वारसांची नावे लावण्यासाठी संशयित आरोपी नामे तलाठी सलीम अकबर तडवी (वय-४४) रा.भडगाव, ता.भडगाव जि.जळगाव याने सुरूवातीला १ हजार रू्पयांची लाच स्वीकारली होती. त्यानंतर पुन्हा तक्रारदार याच्या कडे १ हजार ५०० रूपयांची मागणी महिला कोतवाल कविता नंदु सोनवणे (वय- २७) रा. तांदलवाडी, ता.भडगाव जि.जळगाव यांनी सोबत केली. त्यानंतर तक्रारदार यांनी जळगाव लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची पडताळणीसाठी विभागाने शुक्रवारी १४ एप्रिल रोजी दुपारी सापळा रचला. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शासकीय सुटी असली तरी सुट्टीच्या दिवशी शासकीय कामे करण्यासाठी तलाठी आणि कोतवाल हे कार्यालयात होते. त्यावेळी तक्रारदार यांच्याकडून १ हजार ५০০ हजार रूपयांची लाच घेतांना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन्ही संशयित आरोपीतांविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा सापळा यशस्वी करण्यासाठी जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात ईश्वर धनगर, राकेश दुसाने, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पोहेकॉँ .अशोक अहिरे, पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, महिला पोहेकॉ शैला धनगर, पोना जनार्दन चौथरी, पोना किशोर महाजन, पोना सुनिल वानखेडे, पोना बाळु मराठे, पोकॉँ प्रदिप पोळ , पोकों सचिन चाटे,
पोकों अमोल सुर्यवंशी, पोकॉ प्रणेश ठाकुर यांनी यशस्वी केला.