पू. साने गुरुजी ग्रंथालयाच्या वतीने अमळनेरात होणार वऱ्हाडी हास्य कवी संमेलन व मराठी गझल मुशायरा

पूज्य साने गुरुजी स्मृती पुरस्कार वितरण समारंभ व स्मृती व्याख्यानमाला २०२३

अमळनेर अमळनेर येथील 147 वर्षाची वैभवशाली
परंपरा असलेल्या पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या वतीने दि. १५ व १६ एप्रिल रोजी वऱ्हाडी हास्य कवी संमेलन व मराठी गझल मुशायरा आयोजीत करण्यात आला असून पुरस्कर वितरण सोहळा होणार असल्याचे ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी पत्रकार परिषदेद्वारे कळवीले आहे.

यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे व
चिटणीस प्रकाश वाघ होते.
कार्यक्रमाची प्रस्ताविक वाचनालयाचे संचालक ईश्वर महाजन
यांनी केले.

पूज्य साने गुरुजी ग्रंथालयाच्या वतीने वार्षिक खान्देश स्तरीय पूज्य साने गुरुजी स्मृती पुरस्कार वितरण समारंभ व कै.सखाराम ब.निजसुरे,कै.श्रीमती.कमलबाई सखाराम निजसुरे यांचे स्मरणार्थ कै.प्रा.शेवंताबाई हरिभाऊ बारी यांच्या स्मरणार्थ प्रा.श्री.टी. एच.बारी यांनी दिलेल्या देणगीतून दि. १५व १६ एप्रिल २०२३ रोजी स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने दिनांक १५ एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जुना टाऊन हॉल अमळनेर येथे खानदेश स्तरीय सहावा पूज्य साने गुरुजी स्मृति पुरस्कार वर्ष २०२२-२३ ह.भ.प.पू. सद्गुरु प्रसाद महाराज गादीपती श्री संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान अमळनेर यांच्या शुभहस्ते श्री विजय आधारसिंग पवार संचालक पूज्य साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्र अमळनेर यांनी सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिले आहे म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे . याप्रसंगी वऱ्हाडी हास्य कवी संमेलन ठेवण्यात आलेले आहे. तसेच दि. १६ एप्रिल रोजी मा.श्री.राकेश जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या शुभहस्ते अंबर्शी टेकडी ग्रुप यांनी पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केले बद्दल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच यावेळी मराठी गझल मुशायरा कार्यक्रम हा विनामूल्य ठेवण्यात आलेला असून अमळनेर शहरामधील श्रोते- रसिकांनी जास्तीत जास्त संख्येनी उपस्थीती नोंदवावी व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे पू.साने गुरुजी ग्रंथालयाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे.